संगमेश्वर प्रतिनिधी:-संगमेश्वर फुणगुस मार्गावर कोंड आंबेड कुणबी भवना समोर मोठा खोल खड्डा अपघाताला निमंत्रण ठरत असून सतत अपघात घडत आहेत. हा खड्डा त्वरित बुजविण्यात यावा अशी मागणी होत आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. शास्त्री पुलाचे काम करीत असताना डिंगणी फणगुस कडे जाणाऱ्या रस्ता करण्यात आला मात्र काही अंतरावर असलेले खड्डे न बुजवण्यात आल्याने हे खड्डे मोठे झाले आहेत आणि ते धोकादायक बनत आहेत. मोठ्या खड्ड्यामध्ये वाहने अडकत असून अपघातही घडत आहेत. गाड्यांचे नुकसानी बरोबर प्रवासीही जखमी होत आहेत. त्यामुळे हा खड्डा त्वरित बुजवण्यात यावा अशी मागणी होत आहे.