चिपळुणातील धक्कादायक प्रकार
वालावलकर रूग्णालयातील डॉक्टरांनी काय केलं बघा
चिपळूण : लहान मुलांच्या नाका- तोंडात, कानात पेन्सिल किंवा वस्तू गेल्याचे ऐकलं किंवा पाहिलं असेल, पण एखाद्या प्रौढ झालेल्या व्यक्तीच्या तोंडात अशी वस्तू गेल्याच कधी पाहिलं आहे का? पण हे खरं आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ४६ वर्षीय रुग्णाने चक्क कवळी गिळली. कारणही तसच आहे. हा रुग्ण गोळी घेत होता मात्र पाण्यासोबत कवळी सुद्धा पोटात गेली हे त्या रुग्णाला कळलच नाही. मात्र तोंडाची कवळी कुठे गेली हे समजल तेव्हा पोटात गेली असावी असा त्यांनी अंदाज बांधला. आणि ते खरी ही ठरलं. या रुग्णाला पोट दुखीचा असह्य त्रास होऊ लागला. केळी खाल्ल्यावर थोडेसे बरे वाटू लागले. मात्र, दुखणे थांबत नव्हते. अखेर या रुग्णाने डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. यावेळी गेस्टॉरंटॉलॉजिस्ट डॉ. जोशी यांनी एक्स-रे काढण्याच्या दिलेल्या सल्ल्यानुसार अन्ननलिकेत अडकलेली कवळी पुढे पोटात सरकली असल्याचे एक्सरेत दिसून आले. दोन दिवसांनी जेव्हा परत या रुग्णाने डॉ. जोशी यांना दाखवले असता असे दाताची कवळी पोटातच अडकली असल्याचे लक्षात आले यामुळे अधिक उपचारासाठी या रुग्णाला सिटी स्कॅन करण्यास सांगितले.
जेणेकरून कवळी कुठे अडकली आहे हे लक्षात आल्यानंतर गॅस्ट्रोस्कोपी करून काढणे सोपे होईल. यामुळे गॅस्ट्रोस्कोपी करून पोटातून बाहेर काढून दाताची कवळी अन्ननलिकेपर्यत आणून ठेवली आणि डॉ. जोशींच्या असे निदर्शनास आले की, कवळी अन्ननलिकेतून काढण्यासाठी दुर्बीणीद्वारे शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्याची गरज आहे. त्या कवळीमुळे अन्ननलीका फाटू शकते. क्षणाचाही विलंब न करता डॉ. जोशी यांनी ई. एन्. टी. विभागाचे डॉ. राजीव केणी आणि डॉ. प्रतीक शहाणे यांच्याशी चर्चा करून लगेच रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी घेतले. डॉ. राजीव केणी यांनी दुर्बीणीद्वारे कुठेही चिरफाड न करता दाताची कवळी अखेर सुरक्षितपणे बाहेर काढली. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. प्रतीक शहाणे यांनी मदत केली. तर डॉ. लीना, डॉ. अस्मीता, डॉ. रेवती व डॉ. ऋषभ यांनी भूल देऊन साथ दिली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रुग्णाला घरी सोडण्यात आले. रुग्णासह नातेवाईकांनी डॉ. राजीव केणी, डॉ. प्रतीक शहाणे व डॉ. आनंद जोशी यांचे आभार मानले.