खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ येथील हॉटेल गणपती कृपासमोर दुभाजकाचा अंदाज न आल्याने दाकीस्वार गंभीररित्या जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली.
जाफर मुल्ला (32, रा. खेड) असे गंभीररित्या जखमी झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे. तो एम.एच.08/ए.टी.0563 क्रमांकाच्या दुचाकीवरून खेड येथून चिपळूण येथे जात होता. हॉटेल गणपती कृपासमोर असलेल्या दुभाजकाचा अंदाज न आल्याने त्याच्यावर जावून आदळला. अपघाताचे वृत्त कळताच सामाजिक कार्यकर्ते सुरेश हंबीर यांनी दुचाकी उपचारासाठी तातडीने भरणे येथील रॉयल हॉस्पीलटमध्ये दाखल केले. अपघाताचे वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी पोहून जखमींना मदतकार्य केले.