खेड:-भरणे येथील मध्यवर्ती ठिकाणी ऍपे रिक्षा रस्त्याच्या मध्यभागी उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत विकास राजाराम महाले (47) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने ऍपे रिक्षा (एम.एच. 08 व्ही. 1764) पुलाखाली रहदारीच्या ठिकाणी उभी करून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.