खेड:-कोकण मार्गावरून धावणाऱ्या कोकणकन्या एक्सपेसमधून पवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 90 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्याने हिसकावत पलायन केले. या प्रकरणी मंगळवारी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
अश्विनी अशोक तायडे (47) या कोकणकन्या एक्सप्रेसमधून प्रवास करताना आसनावर झोपल्या होत्या. ही संधी साधत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 7.100 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र खेचून पलायन केले. रेल्वेतील वीजपुरवठा बंद असल्याने त्यांना काहीच समजू शकले नाही. आरडाओरडा केल्यानंतर सर्व प्रवासी जागे झाले. या बाबत तिकीट तपासणीसालाही कळवण्यात आले. मात्र काहीच उपयोग झाला नाही. शेवटी खेड पोलीस स्थानकात त्यांनी तक्रार दाखल केली.