१८ दिवस चालणाऱ्या स्पर्धेत भारताचे एकूण ११७ खेळाडू होणार सहभागी
नवी दिल्ली:-खेळांचा महाकुंभ म्हणून ओळखली जाणारी स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक. दर चार वर्षांनी होणारी ही स्पर्धा क्रीडा विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा, त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होण्याचं स्पप्न प्रत्येत खेळाडू पाहातो.
आता पॅरिसमध्ये यंदा ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होत आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा २६ जुलै रोजी पार पडणार आहे. पण त्याआधी २४ जुलैपासून आधीच वेगवेगळ्या खेळांच्या प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात झाली आहे.
या स्पर्धेत भारताचे एकूण ११७ खेळाडू सहभागी होणार आहे. एकूण १८ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत भारताचे खेळाडू १६ क्रीडा प्रकारांमध्ये खेळताना दिसणार आहेत. सर्वाधिक २९ खेळाडू ऍथलेटिक्समध्ये सहभागी होणार आहेत, त्यापाठोपाठ २१ खेळाडू नेमबाजीमध्ये सहभागी होणार आहेत. दरम्यान, या स्पर्धेत भारतीयांचे सामने कधी आणि किती वाजता आहे, त्याचा घेतलेला आढावा.
भारताचे ऑलिम्पिकचे वेळापत्रक
२५ जुलै
तिरंदाजी – महिला (दुपारी. १ वाजता) आणि पुरुष (संध्या. ५.४५ वाजता) वैयक्तिक क्वालिफायर्स
२६ जुलै –
उद्घाटन सोहळा (रात्री. ११.३० वाजता)
२७ जुलै –
नेमबाजी – १० मीटर एअर रायफल (दुपारी २ वाजल्यापासून) (मेडलसाठीही लढत)
हॉकी – भारत विरुद्ध न्यूझीलंड (रात्री. ९ वाजता)
बॅडमिंटन – सर्व प्रकारातील सामने (दुपारी १२.५० वाजल्यापासून सुरू)
बॉक्सिंग – प्रीती पवार (संध्या. ७ वाजल्यापासून)
रोईंग – पुरुष स्कल्स हिट (दुपारी. १२.३० वाजता)
घोडेस्वारी – ड्रेसेज (दुपारी १ वाजता)
टेबल टेनिस – एकेरी (संध्या. ६.३० वाजल्यापासून)
टेनिस – पुरुष एकेरी पहिली फेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून)
२८ जुलै
नेमबाजी – १० मीटर एअर पिस्तुल पुरुष (दुपारी १ वाजता) आणि महिला (दुपारी ३.३० वाजता)
तिरंदाजी – महिला सांघिक (दुपारी १ वाजल्यापासून)
बॉक्सिंग – निखत झरिन (दुपारी ३.५० वाजल्यापासून) आणि निशांत देव (दुपारी २.४६ वाजल्यापासून)
बॅडमिंटन – सर्व प्रकारातील सामने (दुपारी १२ वाजल्यापासून)
रोईंग – पुरुष स्कल रेपेचेज (दुपारी १.०६ वाजल्यापासून)
टेबल टेनिस -एकेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून)
टेनिस – एकेरी आणि दुहेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून)
जलतरण – पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक आणि महिला २०० मीटर फ्रीस्टाईल (२९ जुलै – रात्री १.०७ वाजता)
२९ जुलै
नेमबाजी –
पुरुष ट्रॅप क्वालिफायर्स (दुपारी १२.३० वाजता)
सांघिक पिस्तुल क्वालिफायर्स (दुपारी १२.४५ वाजता)
१० मीटर एअर रायफल महिला (दुपारी १ वाजल्यापासून) आणि पुरुष (दुपारी ३ वाजल्यापासून) (मेडल्ससाठीही लढत)
तिरंदाजी – पुरुष सांघिक (दुपारी १ वाजल्यापासून)
हॉकी – भारत विरुद्ध अर्जेंटिना (दुपारी ४.१५ वाजता)
बॅडमिंटन – सर्व प्रकारांच्या लढती (दुपारी १ वाजल्यापासून)
टेबल टेनिस – एकेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून)
रोईंग – पुरुष स्कल्स (दुपारी १ वाजल्यापासून)
३० जुलै
नेमबाजी –
१० मीटर एअर पिस्तुल मिश्र संघ, कांस्य पदकासाठी लढत (दुपारी १ वाजल्यापासून), सुवर्णपदकासाठी १.३० वाजल्यापासून)
पुरुष ट्रॅप अंतिम फेरी (पदकासाठी लढती) (संध्या. ७ वाजल्यापासून)
महिला ट्रॅप क्वालिफायर्स
हॉकी – भारत विरुद्ध आयर्लंड (दुपारी. ४.४५ वाजता)
बॅडमिंटन – सर्व प्रकारांच्या लढती (दुपारी १२ वाजल्यापासून)
बॉक्सिंग – प्रीती पवार (दुपारी ३.५० वाजल्यापासून) जास्मिन (दुपारी ४.३८ वाजल्यापासून)
तिरंदाजी – महिला आणि पुरुष (दुपारी ३.३० वाजल्यापासून)
रोईंग – पुरुष स्कल्स उपांत्यपूर्व फेरी (दुपारी १.४० वाजता)
घोडेस्वारी – ड्रेसेज जीपी (दुपारी २.३० वाजता)
टेबल टेनिस – पुरुष आणि महिला (दुपारी १.३० वाजल्यापासून)
टेनिस – पुरुष आणि दुहेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून)
Paris Olympic 2024 : Mirabai Chanu दिवसाला उचलते १२,००० kg वजन; विराटला तिला ‘मॅच’ करण्यासाठी…
३१ जुलै
नेमबाजी –
ट्रॅप महिला अंतिम फेरी (पदकासाठी लढती) (संध्या. ७ वाजता)
पुरुष ५० मीटर ३ पोझिशन्स क्वालिफायर्स
बॅडमिंटन – सर्व प्रकारांच्या लढती (दुपारी १२ वाजल्यापासून)
बॉक्सिंग – लवलिना बोर्गोहेन (दुपारी ३.३४ वाजल्यापासून), निशांत देव (संध्या. ७.४८ वाजल्यापासून)
टेबल टेनिस – महिला आणि पुरुष (दुपारी १.३० वाजल्यापासून)
घोडेस्वारी – ड्रेसेज ग्रँड प्रिक्स (दुपारी १.३० वाजल्यापासून)
टेनिस – एकेरी तिसरी फेरी आणि दुहेरी उपांत्य फेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून)
१ ऑगस्ट
नेमबाजी –
पुरुष ५० मीटर रायफल ३ पोसिशन्स अंतिम फेरी (पदकासाठी लढती) (दुपारी १ वाजल्यापासून)
महिला ५० मीटर रायफल ३ पोसिशन्स क्वालिफायर्स (दुपारी ३.३० वाजता)
हॉकी – भारत विरुद्ध बेल्जियम (दुपारी. १.३० वाजल्यापासून)
ऍथलेटिक्स – २० किमी चालण्याची शर्यत, महिला (दुपारी १२.५० वाजता) आणि पुरुष (रात्री ११ वाजता)
बॅडमिंटन – दुहेरी उपांत्यपूर्व फेरी महिला (दुपारी १२ वाजल्यापासून) आणि पुरुष (दुपारी ४.३० वाजल्यापासून)
एकेरी उपउपांत्यपूर्व फेरी पुरुष (दुपारी १.१० वाजल्यापासून), महिला (रात्री १० वाजल्यापासून)
बॉक्सिंग – निखत झहिन (दुपारी २.३० वाजल्यापासून), प्रीती पवार (दुपारी ४.०६ वाजल्यापासून)
टेबल टेनिस – उपांत्यपूर्व फेरी, महिला (दुपारी १.३० वाजल्यापासून), पुरुष (दुपारी ३.३० वाजल्यापासून)
टेनिस – एकेरी उपांत्यपूर्व फेरी (दुपारी ३.३० वाजल्यापासून)
गोल्फ – पुरुष पहिली फेरी (दुपारी १२.३० वाजता)
सेलिंग – पुरुष आणि महिला डिंघी
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेतील खेळाडूंना नसणार वयाला बंधन; ११ वर्षीय मुलगी ते ६१ वर्षीय वयस्क हाेणार सहभागी
२ ऑगस्ट
नेमबाजी –
महिला ५० मीटर रायफल ३ पोझिशन्स अंतिम फेरी (पदकासाठी लढती) (दुपारी १ वाजता)
२५ मीटर पिस्तुल महला क्वालिफायर्स (दुपारी १२.३० वाजता)
स्किट महिला क्वालिफायर्स (दुपारी १२.३० वाजता)
बॅडमिंटन – दुहेरी उपांत्य फेरी, महिला (दुपारी १२ वाजल्यापासून), पुरुष (दुपारी २.२० वाजल्यापासून)
एकेरी पुरुष उपांत्यपूर्व फेरी (रात्री. ९.१० वाजल्यापासून)
ज्युदो – (दुपारी. १.३० वाजता)
बॉक्सिंग – जास्मिन (संध्या. ७ वाजल्यापासून), अमित पांघल (जर उपांत्यपूर्व फेरीत पोहचला तर) (रात्री. ८.०४ वाजल्यापासून)
गोल्फ – पुरुष दुसरी फेरी (दुपारी १२.३० वाजता)
ऍथलेटिक्स – पुरुष गोळाफेक क्वालिफायर्स (रात्री. ११.४० वाजता)
सेलिंग – पुरुष आणि महिला डिंघी
टेबल टेनिस – पुरुष आणि महिला एकेरी उपांत्य फेरी (जर पात्र ठरले तर)
३ ऑगस्ट
नेमबाजी –
महिला २५ मीटर पिस्तुल अंतिम फेरी (पदकासाठी लढती) (दुपारी १ वाजल्यापासून)
स्किट पुरुष अंतिम फेरी (संध्या. ७ वाजल्यापासून)
स्किट महिला क्वालिफायर्स
बॅडमिंटन –
महिला एकेरी उपांत्यपूर्व फेरी (दुपारी १ वाजता)
महिला दुहेरी – कांस्यपदकासाठी लढत (संध्या. ६.३० वाजता), सुवर्णपदकासाठी लढत (संध्या. ७.४० वाजता)
बॉक्सिंग – निशांत देव (उपांत्यपूर्व फेरी जर पोहचला तर) (संध्या. ७.३२ वाजल्यापासून), निखत झरिन (उपांत्यपूर्व फेरी जर पोहचली तर)(रात्री. ८.०४ वाजल्यापासून)
ऍथलेटिक्स – पुरुष गोळाफेक अंतिम फेरी (पदकासाठी लढती) (रात्री ११.०५ वाजल्यापासून)
गोल्फ – पुरुष तिसरी फेरी (दुपारी १२.३० वाजल्यापासून)
सेलिंग – पुरुष आणि महिला
टेबल टेनिस – महिला अंतिम फेरी (जर पात्र ठरले तर)
४ ऑगस्ट
बॅडमिंटन – पुरुष दुहेरी पदकासाठी लढती, कांस्यपदक (संध्या. ६.३० वाजता), सुवर्णपदक (संध्या. ७.४० वाजता)
हॉकी – उपांत्यपूर्व फेरी (१.३० वाजल्यापासून)
तिरंदाजी – पुरुष एकेरी उपउपांत्यपूर्व ते अंतिम फेरी (पदकासाठीही लढती) (दुपारी १ वाजल्यापासून)
गोल्फ – पुरुष अंतिम फेरी (दुपारी १२.३० वाजल्यापासून)
नेमबाजी –
स्किट महिला अंतिम फेरी (पदकासाठी लढती) (संध्या. ७ वाजल्यापासून)
पुरुष २५ मीटर क्वालिफायर (दुपारी १ वाजता)
बॉक्सिंग – जास्मिन (उपांत्यपूर्व फेरी)(दुपारी २.३० वाजल्यापासून), लवलिना बोर्गोहेन (उपांत्यपूर्व फेरी) (दुपारी ३.०२ वाजल्यापासून), प्रीती पवार (उपांत्य फेरी) (दुपारी ३.३४ वाजल्यापासून), अमित पांघल (उपांत्य फेरी) (दुपारी ३.५० वाजल्यापासून) (जर हे सर्व पात्र ठरले तर)
ऍथलेटिक्स – लांब उडी क्वालिफायर्स (दुपारी २.३० वाजल्यापासून)
घोडेस्वारी – ड्रेसेज ग्रँड प्रिक्स
सेलिंग – महिला आणि पुरुष डिंघी
Paris Olympic 2024 : फुटबॉलचा थरार आजपासून रंगणार; युरो, कोपा विजेते स्पेन-अर्जेंटिनावर लक्ष
५ ऑगस्ट
बॅडमिंटन –
एकेरी पदकांसाठी लढती – महिला कांस्यपदक (दुपारी. १.१५ वाजता), महिला सुवर्णपदक (दुपारी २.२५ वाजता)
पुरुष कांस्यपदक (संध्या. ६ वाजता), पुरुष सुवर्णपदक (संध्या. ७.१० वाजता)
नेमबाजी –
पुरुष २५ मीटर पिस्तुल अंतिम फेरी (पदकासाठी लढती) (दुपारी १ वाजल्यापासून)
मिश्र स्किट क्वालिफायर्स (दुपारी १२.३० वाजता), अंतिम फेरी (रात्री. ६.३० वाजता)
ऍथलेटिक्स – महिला ४०० मीटर पहिली फेरी (दुपारी. ३.२५ वाजता), पुरुष स्टिपलचेस पहिली फेरी (रात्री १०.३४ वाजता), मबिला ५००० मीटर अंतिम फेरी (६ ऑगस्ट – रात्री. १२.४० वाजता)
कुस्ती – संध्या. ६.३० वाजल्यापासून
सेलिंग – महिला आणि पुरुष
टेबल टेनिस – महिला आणि पुरुष सांघित उपउपांत्यपूर्व फेरी
६ ऑगस्ट
कुस्ती – पदकासाठी लढती (दुपारी २.३० वाजल्यापासून)
ऍथलेटिक्स – पुरुष भालाफेक क्वालिफायर्स (दुपारी १.५० वाजता आणि ३.२० वाजता)
पुरुष लांब उडी अंतिम फेरी (रात्री ११.५० वाजता)
हॉकी – पुरुष उपांत्य फेरी (जर पात्र ठरलो तर) (संध्या. ५.३० वाजता किंवा रात्री १०.३० वाजता)
कुस्ती – दुपारी ३.०० वाजता
बॉक्सिंग – निखत झरिन (उपांत्यफेरी) (७ ऑगस्ट – रात्री १.३२ वाजता), निशांत देव (उपांत्यफेरी) (७ ऑगस्ट – रात्री १ वाजता) (पात्र ठरले तर)
सेलिंग – महिल आणि पुरुष पदकांसाठी शर्यती
महिला भालाफेक क्वालिफायर्स
७ ऑगस्ट
वेटलिफ्टिंग – मिराबाई चानू (रात्री. ११ वाजता)
कुस्ती – पदकांसाठी लढती (दुपारी २.३० वाजल्यापासून)
टेबल टेनिस – पुरुष आणि महिला सांघिक उपांत्यपूर्व फेरी (दुपारी १.३० वाजल्यापासून), पुरुष उपांत्य फेरी (रात्री ११ वाजल्यापासून)
गोल्फ – महिला पहिली फेरी (दुपारी १२.३० वाजता)
८ ऑगस्ट
ऍथलेटिक्स – पुरुष भालाफेक अंतिम फेरी (रात्री ११.५५ वाजता)
हॉकी – कांस्यपदक (५.३० वाजता), सुवर्णपदक (१०.३० वाजता)
कुस्ती – पदकांसाठी लढती (दुपारी २.३० वाजल्यापासून)
बॉक्सिंग – लवलिना बोर्गोहेन उपांत्यफेरी (९ ऑगस्ट – रात्री १.३२ वाजता), अमित पांघल अंतिम फेरी (९ ऑगस्ट – रात्री २.०४ वाजता), प्रीती पवार अंतिम फेरी (९ ऑगस्ट – रात्री २.२१ वाजता) (पात्र ठरले तर)
कुस्ती – दुपारी ३ वाजल्यापासून
गोल्फ – महिला दुसरी फेरी (दुपारी १२.३० वाजल्यापासून)
९ ऑगस्ट
बॉक्सिंग – निखत झरीन अंतिम फेरी (१० ऑगस्ट – रात्री १.१७ वाजता), निशांत देव अंतिम फेरी (१० ऑगस्ट – रात्री १.०० वाजता) (पात्र ठरले तर)
कुस्ती – पदकासांठी लढती (दुपारी २.३० वाजल्यापासून)
ऍथलेटिक्स – 4X400 मीटर पहिली फेरी, महिला (दुपारी २.१० वाजता), पुरुष (दुपारी २.३५ वाजता)
महिला हर्डल्स उपांत्य फेरी (दुपारी ३.३५ वाजता)
पुरुष तिहेरी उड़ी अंतिम फेरी (रात्री.११.४० वाजता)
गोल्फ – महिला तिसरी फेरी (दुपारी १२.३० वाजता)
१० ऑगस्ट –
बॉक्सिंग – लवलिना बोर्गोहेन अंतिम फेरी (११ ऑगस्ट – रात्री. २.०४ वाजता) (पात्र ठरली तर)
गोल्फ – महिला अंतिम फेरी (दुपारी १२.३० वाजता)
कुस्ती – दुपारी ३ वाजल्यापासून
ऍथलेटिक्स- महिला भालाफेक अंतिम फेरी (रात्री ११.१० वाजता)
११ ऑगस्ट
कुस्ती – पदकासांठी लढती दुपारी २.३० वाजल्यापासून