नुकसान झालेल्या वर्ग खोल्यासाठी पालकमंत्री उदय सामंत,किरण सामंत यांनी दिला निधी
राजापूर / प्रतिनिधी:- कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील शिवणे बुद्रुक येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीवर झाड कोसळून दोन वर्ग खोल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर घटनेची माहिती मिळताच जेष्ठ उद्योजक, सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी पदाधिकारी तसेच कार्यकर्यांसह प्रत्यक्ष स्थळी भेट दिली व तात्काळ व्हीडिओ कॉन्फरेन्सद्वारे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हाचे पालकमंत्री उदय सामंत यांना झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष वस्तुस्थितीची माहिती करून दिली. पालकमंत्री उदय सामंत त्याच वेळी विडिओ कॉन्फरेन्सद्वारे जिल्हा प्रशासनास आदेश देत नवीन दोन वर्ग खोल्याना निधीला मंजूरी देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिले.
महत्त्वाचं म्हणजे या शाळेतील विद्यार्थ्यांना काही कार्यक्रमानिमित्त दुसरा इमारतीच्या वर्गामध्ये एकत्रित बसवण्यात आले होते आणि अशावेळी हे झाड पडून येथील मोठी दुर्घटना टळली आहे त्यामुळे या शाळेतील सर्व चिमुकल्यांचा जीव वाचला आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून येथील पालक, शिक्षक, केंद्रप्रमुख, ग्रामसेवक, मुख्याध्यापक पदाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क साधत येथील समस्या जाणून घेतली आणि तात्काळ येथे लोकांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांनी केलेल्या कामाचे राजापूर वासियांनी कौतुक करत त्यांचे आभार सुद्धा मानले आहे.
याप्रसंगी तालुकाप्रमुख दीपक नागले, उपतालुकाप्रमुख चंद्रकांत जानस्कर, विभागप्रमुख मनिष लिंगायत, युवासेना उपविभाग प्रमुख गणेश लाड, वडवली शाखाप्रमुख विठ्ठल शेलार, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रणित आमटे, केंद्रप्रमुख पंडित मॅडम, मुख्याध्यापक प्रकाश बाईत, ग्रामसेवक पवार, सरपंच भोसले मॅडम, उपसरपंच जाधव तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.