गुहागर:-गुहागर तालुक्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये नुकसानीचे सत्र सुरू असून गेल्या 24 तासात 10 ठिकाणी सुमारे 1 लाख 800 रूपये इतक्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. वृक्ष मोडणे, बांध कोसळणे, घराचे पत्रे उडणे आदी घटनांचा यामध्ये सामावेश आहे.
गुहागर तालुक्यातील आरे येथील माधुरी श्रीनिवास भोसले यांच्या घराच्या पडवीचे छत कोसळुन सुमारे 15 हजार रूपये नुकसान झाले आहे. अडूर दिपक प्रकाश जाधव यांच्या राहत्या घरावर आंब्याची झाड पडून घराचे सुमारे 18 हजार 900 रूपयाचे नुकसान, लिटल चाम्स इंग्लिश मिडीअम स्कूल जानावळे येथील बांध कोसळून 16 हजाराचे नुकसान, वेळंब वचन वाडी येथील निर्मला नारायण पोसरेकर यांच्या घराचे पत्रे उडून रूपये 3 हजार रूपये नुकसान, वेळंब कातळवाडी येथील निर्मला पमोद राणे यांच्या घराचे पत्रे उडून 2 हजार रूपये नुकसान, वेळंबमधील नम्रता नितीन गुरव यांच्या शौचालयाचे पत्रे उडून 2400 रूपये नुकसान, आरे येथील प्रमिला प्रकाश देवकर यांच्या घराचे पत्रे उडून 25 हजार रूपयाचे नुकसान, पालपेणे येथील चंद्रकांत बाळकृष्ण काताळकर यांच्या गोठ्याचे अंशत: 2 हजार रूपयाचे नुकसान, घाडेवाडी तर्फे वेळंबमधील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा नं. 2 शाळेच्या सभागृहाचे पत्रे व इमारतीच्या कौलांचे सुमारे 9500 रूपयाचे नुकसान, नरवण येथील विजया दत्तात्रय नाटुस्कर यांच्या गोटयावर झाड पडल्याने गोठयाचे सुमारे 7000 रूपयाचे नुकसान झाले आहे.