खेड : गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील निळवणे-कातळवाडी येथील रस्ता खचल्याने वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. खचलेल्या रस्त्यामुळे एसटी बसेससह अन्य वाहने मार्गस्थ होत नसल्याने ग्रामस्थांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. खचलेल्या रस्त्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांना ये-जा करणे अशक्य झाले आहे. रस्त्याची लवकरच दुरूस्ती होणे देखील अशक्य आहे. यामुळे ग्रामस्थांची एसटी बसेसअभावी हेळसांड होणार आहे. तलाठ्यांमार्फत खचलेल्या रस्त्याचा पंचनामा देखील करण्यात आला आहे. तसा अहवाल तहसीलदार यांना सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.