खेड : शहरातील तीनबत्तीनाका येथे रहदारीच्या ठिकाणी चारचाकी वाहन उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अलोक विजय चव्हाण (21) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वत: च्या ताब्यातील इको कार रहदारीच्या ठिकाणी उभी करत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.