चिपळूण : तालुक्यातील कुटरे येथे बेकायदा हातभट्टीची गावठी दारु विक्रेत्यावर शनिवारी सावर्डे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विरेंद्र बाबू कदम (53, चिपळूण) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद उमेश गणपत कांबळे यांनी दिली. विरेंद्र कदम हा कुटरे येथे कॅनलच्या साईडला आंब्याच्या झाडाखाली बेकायदा गावठी दारु विक्री करत होता. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.