रत्नागिरी : गणपतीपुळे येथे खासगी गाडीवर चालक असलेल्या बेळगाव येथील तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल़ी. ही घटना शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आल़ी. प्रकाश मारुती कुंभार (44, ऱा चिकोडी-बेळगाव) असे मृताचे नाव आह़े. या घटनेची नोंद जयगड पोलिसांत करण्यात आली आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश कुंभार हा गणपतीपुळे येथे चालक म्हणून काम करत होत़ा. शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास तो राहत असलेल्या गेस्टरुममध्ये त्याचा मृतदेह सिलिंग फॅनला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. याबाबतची नोंद जयगड पोलिसात करण्यात आली आह़े. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आह़े.