पती-पत्नीवर गुन्हा
चिपळूण:-शेतजमिनीच्या वादातून पती-पत्नीने सुरशिंग रामचंद्र कदम (टेरव) यांना मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी 8.30च्या सुमारास तालुक्यातील टेरव-राधाकृष्णवाडी येथे घडली. यात ते जखमी झाले असून या प्रकरणी मारहाण करणाऱ्या पती-पत्नीवर चिपळूण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित कृष्णकांत मोरे, अपर्णा अजित मोरे (टेरव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरशिंग कदम व अजित मोरे यांच्यात सामाईक शेतजमिनीबाबत वाद आहेत. या जमिनीत सुतारवाडी येथील पांडुरंग वासकर हे ट्रक्टर घेऊन शेत नांगरणीसाठी उभे होते. त्यावेळी सुरशिंग कदम यांनी वासकर यांना हा जमिनीचा वाद चालू असून शेत नागरू नका असे सांगितले. शेत नांगरणीस हरकत घेतल्याचा राग मनात धरून अजित मोरे, अपर्णा मोरे यांनी कदम यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण केली. यात ते जखमी झाले. या मारहाणप्रकरणी अजित मोरे, अपर्णा मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.