चिपळूण:-बेकायदा मुंबई मटका जुगार चालवणाऱ्यावर धाड टाकून गुन्हा दाखल केल्याची घटना गुरुवारी घडली. प्रदीप दशरथ गुंजाळ (37, बहाद्दूरशेख नाका) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून 510 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अशोक विठ्ठल मुंडे यांनी दिली. गुंजाळ हा बेकायदा मुंबई मटका, जुगाराचे साहित्य जवळ बाळगून लोकांकडून पैसे स्वीकारुन जुगार चालवत होता.