जाकादेवी/ वार्ताहर:-भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी शाखेतर्फे रविवार दिनांक २१ जुलैपासून आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या तीन महिन्यांचे कालावधीत बौद्धांच्या या मंगल दिवसांपैकी एक असलेला वर्षावास सुरू होत असून, या कार्यक्रमांचे नियोजन संस्थेच्या वतीने प्रत्येक शाखेमध्ये करण्यात आले आहे.
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, तालुका शाखा रत्नागिरीचे यांच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक २१ जुलै रोजी सकाळी ११.०० वाजता पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी येथील ठाकूर सभागृहात, तालुका अध्यक्ष आयु. विजय मोहीते व त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे संस्कार विभाग प्रमुख आयु. संजय कांबळे हे मार्गदर्शन करणार आहेत. या वर्षावास प्रारंभ कार्यक्रमासाठी तालुक्यातील संस्थेचे सर्व ग्रामशाखेतील बौध्दाचार्य, श्रामणेर, केंद्रीय शिक्षक,शिक्षिका, समता सैनिक दलातील सैनिक यांनी व तालुक्यातील सर्व धम्म बांधव व अनुयायी यांनी उपस्थित राहावे असे आवाहन वजा विनंती तालुका शाखा रत्नागिरीच्या नूतन कार्यकारिणीचे अध्यक्ष आयु. विजय मोहिते, सचिव- दिपक जाधव, कोषाध्यक्ष- भगवान जाधव, संस्कार विभाग प्रमुख- संजय कांबळे, सचिव- गौतम सावंत, प्रितम सावंत, संरक्षण विभाग प्रमुख- शरद पवार, सचिव- चंद्रमणी सावंत, सुभाष कदम, प्रचार व पर्यटन विभाग प्रमुख- विकास पवार, सचिव- तुषार जाधव, आदेश कांबळे, कार्यालयीन- सचिव देवदत्त चवेकर, हिशोब तपासणीस- दिपक पवार, संघटक- नंदकुमार यादव, जयवंत जाधव, सुगंध कदम, सुनिल जाधव, राहुल पवार, वैभव यादव, सुनिल पवार आदी सर्व पदाधिकारी यांचे वतीने करण्यात आले आहे.