जाकादेवी/ वार्ताहर-रत्नागिरी तालुक्यातील जि.प केंद्रीय शाळा ओरी नं १ या शाळेला श्री. रमाकांत देसाई यांच्या सौजन्याने विद्यार्थी मित्र फाउंडेशन एज्युकेशन मंडळ मुंबई यांच्याकडून ओरी प्राथमिक शाळेतील सर्व मुलांना दप्तर व वर्गनिहाय्य वह्या तसेच शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
शाळेतील मुलांची गरज ओळखून विद्यार्थी मित्र फाउंडेशन मंडळ मुंबई यांनी विद्यार्थ्यांना पुरेसे शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या स्तुत्य आणि अनुकरणीय देणगीबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संकेत उर्फ बंड्या देसाई शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष श्री. वसंत जाधव,शाळेचे मुख्याध्यापक श्री.आंबवकर पदवीधर शिक्षिका सौ. समिक्षा पवार उपशिक्षक श्री.पडुळे , श्री. चव्हाण आणि पालक वर्ग यांनी मनापासून धन्यवाद दिले.या शैक्षणिक वितरण कार्यक्रमाप्रसंगी प्रमिला देसाई, प्रतिक जाधव,श्री.रामाणे यांसह पालक उपस्थित होते.