सावर्डे: चिपळूण तालुक्यातील सावर्डे हद्दीतील आगवे गावातील मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपूल खचल्याने महामार्गाचा कामाचा दर्जा बाबत पुन्हा प्रचिती आलेले आहे.
तालुक्यातील गावातील वाहाळ फाटा वरील उड्डाणपूल पावसाचा पहिल्या इनिंग मध्येच खचल्याने उड्डाणपुलावर खाचलेल्या ठिकाणी काँक्रीट रस्त्यावर खडीकरण करून खचलेला रस्ता लपवण्यात आला आहे.. रस्ता खचल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ हा उड्डाणपुलात येथे दुतर्फा बंद करून महामार्गावरील अवजड वाहनांसहित सर्व प्रकारचे वाहने वाह फाटावरून सावर्डे रेल्वे स्टेशन कडे जाणारा सर्विस रोड वरून वाळवण्यात आली आहेत त्यामुळे उड्डाणपूल वरील अपघात टळला आहे, परंतु तेथील सर्विस रोड पूर्वीच निष्कृष्ट दर्जाचा असल्याने त्या सर्विस रोडवर खड्डांचा साम्राज्य होते त्यात अवजड वाहने सर्विस रोड वरती वळवल्याने त्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना त्या सर्विस रोडवरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे तसेच सावर्डे रेल्वे स्टेशन कडे जाणार प्रवासी यांना खड्ड्यातूनच हळत डुलत प्रवास करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे तीव्र पडसाद उमटत आहेत… तरी येथील ग्रामस्थांची होणारी गैरसोय लवकर थांबावी तसेच येथे अपघात होऊन कोणतीही हानी झाल्यास सर्वस्वी महामार्गाचे शासकीय अधिकारी जबाबदार असतील असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.