मुंबई/उदय दणदणे:-जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार पूनम पाटगावे यांना नुकताच जॉय सामाजिक संस्थेच्या वतीने आदर्श सामजिक कार्यकर्त्या पुरस्कार देऊन जोगेश्वरी पूर्व येथील नवनियुक्त खासदार रवींद्र वायकर यांनी सन्मानित केले. पूनम यांनी वारंवार लेखणीच्या माध्यमातून जोगेश्वरी विभागातील समस्या मांडून त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला असून, एक आघाडीच्या पत्रकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
अनेक वर्षापासून त्या पत्रकारिता बरोबरच सामाजिक कार्यक्रमात देखील सक्रिय सहभाग नोंदवित आहेत.पुरस्कार वितरण करण्यासाठी जॉय चे सर्वेसर्वा संस्थापक तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे हे देखील प्रामुख्याने उपस्थित राहिले होते.