कडवई : संगमेश्वर तालुका हिंदी शिक्षक मंडळाची वार्षिक नियोजन सभा दादासाहेब सरफरे विद्यालय,बुरंबी येथे पार पडली.या सभेत मंडळातर्फे वर्षभर राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.
नियोजनानुसार हिंदी दिन पंधरवडा समाप्ती कार्यक्रम माध्यमिक विद्यालय, करजुवे येथे घ्यायचे ठरले आहे.तसेच हिंदी दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा,विज्ञापन प्रस्तुतीकरण स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, कहानीलेखन स्पर्धा घेण्यात येणार आहेत.या स्पर्धांची जबाबदारी हिंदी शिक्षकांना वाटून देण्यात आली.या कार्यक्रमात यंदाचा उपक्रमशील हिंदी अध्यापक पुरस्कार दाभोळे हायस्कूलच्या मनोज कनावजे यांना जाहीर करण्यात आला.कार्यक्रमाला बुरंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश वीरकर उपस्थित होते.त्यांनी मार्गदर्शन करताना हिंदी संघटनेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमाला हिंदी अध्यापक मंडळ रत्नागिरीचे कार्याध्यक्ष राजेंद्र खांबे, सचिव मिलिंद कडवईकर,संगमेश्वर तालुकाध्यक्ष सुहास गेल्ये, उपाध्यक्ष मनोज कनावजे, सूरज माने,सचिव सुशांत माईन उपस्थित होते.
सभेत झालेल्या चर्चेत सुनिल कांबळे,अजित जाधव, लालसाब मुलाणी, शेख सर,अशोक कदम, सुरेश सुवरे,प्रशांत राऊत, अनंत गिडये, अभिजित कदम,सुनील कोरे,सुरेश डोणे यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कडवईकर यांनी केले तर आभारप्रदर्शन सूरज माने यांनी केले.