वनडे आणि टी २० संघासाठी उपकर्णधार शुभमन गिल
हार्दिक पांड्याकडून काढलं उपकर्णधारपद
मुंबई- आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघातून टी २० मालिकेची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर, तर वनडेचं कर्णधारपद रोहित शर्मा याच्याकडेच असेल.
तसेच वनडे आणि टी २० संघासाठी उपकर्णधार शुभमन गिल याच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान हार्दिक पांड्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये २७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान तीन सामन्यांची वनडे आणि तीन सामन्यांची टी २० मालिका खेळवली जाणार आहे. टी २० चे सर्व सामने पल्लेकेले आंतरराष्ट्रीय मैदानात ेथे होणार आहेत, तर वनडे सामने कोलंबो येथील आर. प्रेमदासा मैदानात होणार आहेत.
टी २० मालिकेसाठी भारतीय संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जायस्वाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंगटन सुंदर, अर्शधीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा
टी २० मालिकेचं वेळापत्रक – पहिला सामना – शनिवार, २७ जुलै, रात्री सात वाजता, दुसरा सामना – रविवार, २८ जुलै, रात्री सात वाजता आणि तिसरा सामना – मंगळवार, ३० जुलै, रात्री सात वाजता
वनडे मालिकेचं वेळापत्रक – पहिला सामना – शुक्रवार, २ ऑगस्ट, दुपारी २.३० वाजता, दुसरा सामना – रविवार, ४ ऑगस्ट – दुपारी २.३० वाजता, तिसरा सामना – बुधवार, ७ ऑगस्ट दुपारी २.३० वाजता