रत्नागिरी:-रत्नागिरीतील रस्त्यांबाबत नेहमीच नेहमीच विविध घटना पाहायला, ऐकायला मिळत आहे. कुठे रस्ता खणने, कुठे रस्त्यात पाणी साचने, रस्त्याला खड्डे या साऱ्या प्रकाराने रत्नागिरीतील रस्त्यांची पोलखोल केली जाते. मात्र तरीही रस्त्याबाबत नगर परिषदेला जाग येत नाही. शहरातील माळनाका येथील चांगल्या रस्त्याला अज्ञाताने खड्डा पाडला आणि हा खड्डा मातीने बुजवण्यात आला होता.
मात्र आज दिवसभर कोसळलेल्या पावसाने येथे चिखल झाला होता. सायंकाळच्या सुमारास पार्सलची वाहतूक करणारा छोटा हत्ती या मातीत अडकल्याने त्यांची चांगलीच गोची झाली. हा छोटा हत्ती काढताना त्याच्या नाकीनऊ आले. जवळपास एक तास हा छोटा हत्ती वर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. सायंकाळी 4.30 च्या दरम्याने अडकलेला हत्ती 5.30 वाजण्याच्या दरम्यान बाहेर काढण्यात यश आले.