ओमान:-ओमानच्या समुद्रात तेलवाहु जहाज उलटले होते. यामध्ये 13 भारतीय होते. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा येथील समरान इब्राहिम सय्यद (कसबा- पारकर वाडा) याचाही समावेश होता. बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत होता.
दोन दिवसानंतर आज गुरुवार 18 जुलै 2024 रोजी ओमान रुग्णालयात उपचारादरम्यान समरान सय्यद याचे निधन झाल्याची माहिती कुटुंबाला कळवण्यात आली आहे. यावेळी कंपनीने कुटुंबीयांना मेसेज पाठवला. यामध्ये अल्लाह त्यांना जन्नतुल फिरदौसमध्ये सर्वोच्च स्थान देवो आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना धैर्य देवो असा मेसेज कंपनीने कळवला आहे.
समरानच्या मृत्यूनंतर संगमेश्वर कसबा येथे त्यांच्या नातेवाईकांनी सांत्वनासाठी धाव घेतली. गुरुवारी कसबा येथे त्यांचे नातवाईक जमा झाले.