रत्नागिरी:-जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ऑनलाईन 57 हजार 269 तर ऑफलाईन पध्दतीने 1 लाख 62 हजार 808 अर्ज असे एकूण 2 लाख 20 हजार 77 महिलांनी अर्ज दाखल केलेले आहे. जिल्ह्याला एकूण असलेल्या उद्दिष्टापैकी 74.94 टक्के इतके उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
जिल्ह्यात राजापूर तालुक्याने उत्तम कामगिरी केली असून 29937 उद्दिष्टांपैकी अर्ज 28904 प्राप्त झाले असून, प्रमाण 96.55 टक्के आहे.
महिलांना सक्षम करण्यासाठी, महिला भगिनी घरातील आर्थिक नियोजन करत असताना त्या आर्थिक नियोजनामध्ये सरकारचा देखील सहभाग असावा, यासाठी देशातील पहिला ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात जोरात सुरु आहे.
तालुकानिहाय उद्दिष्ट, प्राप्त अर्ज संख्या आणि टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 8266 उद्दिष्टांपैकी अर्ज 6614 प्राप्त झाले असून, प्रमाण 80.01 टक्के, दापोली 36547 उद्दिष्ट पैकी अर्ज 25954 प्राप्त झाले असून प्रमाण 71.02 टक्के, खेड 35505 उद्दिष्ट पैकी अर्ज 18472 प्राप्त झाले असून प्रमाण 52.03 टक्के, चिपळूण 34323 उद्दिष्ट पैकी अर्ज 29719 प्राप्त झाले असून प्रमाण 86.59 टक्के, गुहागर तालुक्यात 29766 उद्दिष्ट पैकी अर्ज 17606 प्राप्त झाले असून प्रमाण 59.15 टक्के, संगमेश्वर 38716 उद्दिष्ट पैकी अर्ज 27402 प्राप्त झाले असून प्रमाण 70.78 टक्के, रत्नागिरी 61251 उद्दिष्ट पैकी अर्ज 48772 प्राप्त झाले असून प्रमाण 79.63 टक्के, लांजा तालुक्याला 19365 उद्दिष्ट पैकी अर्ज 16634 प्राप्त झाले असून प्रमाण 85.90 टक्के, राजापूर तालुक्यात 29937 उद्दिष्ट पैकी अर्ज 28904 प्राप्त झाले असून प्रमाण 96.55 टक्के आहे.