रत्नागिरी : कोकण रेल्वेमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक पदावर काम करीत असलेले विठोबा राऊळ ऊर्प माऊली यांनी नेत्रावती एक्सप्रेस या गाडीत कार्यरत असताना त्यांना सापडलेली साधारणपणे अडीच ते तीन ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी रत्नागिरी रेल्वे पोलिसांकडे सुपूर्द केली.
नेत्रावती एक्सप्रेसमध्ये ड्युटी करत असताना राऊळ यांना एका बोगीमध्ये सोन्याची साखळी आढळून आली. त्यांनी ती साखळी रत्नागिरी येथे आरपीएफ कॉन्स्टेबल अनंत सुहारे यांच्याकडे सुपूर्द केली. संबंधित व्यक्तींनी साखळी आपलीच असल्याचे दस्तऐवज दाखवून घेऊन जावी, असे आवाहन आरपीएफतर्फे करण्यात आले आहे.