संशयित महिलेविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा
रत्नागिरी : सदनिका विक्री करण्याच्या बहाण्याने रत्नागिरीतील व्यावसायिकाला 23 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आह़े. शेखर शांताराम म्हाप (59, ऱा हातखंबा, रत्नागिरी) असे या व्यावसायिकाचे नाव आह़े. या प्रकरणी म्हाप यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केल़ी. त्यानुसार पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केल़ा. अश्विनी महेश ओझा (ऱा हातकणंगले ज़ि कोल्हापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी ओझा यांनी आपले सावर्डे-चिपळूण येथील तीन फ्लॅट शेखर म्हाप यांना 40 लाख रुपयांना देण्याचे मान्य केले होत़े. यासंबंधीची बोलणी तक्रारदार यांच्या कार्यालयात झाली होत़ी. ठरल्याप्रमाणे 3 सदनिका विकत घेण्यासंबंधी शेखर म्हाप यांनी 20 सप्टेंबर 2021 रोजी अश्विनी ओझा याने सांगितलेल्या खात्यावर 20 लाख 50 हजार रुपये जमा केल़े तसेच शेखर म्हाप यांचा मुलगा सुमित म्हाप याने 2 लाख 50 हजार रुपये रक्कम ओझा यांनी सांगितलेल्या खात्यावर जमा केल़ी. यानंतर संशयितांनी ठरल्याप्रमाणे एक वर्षानंतर साठेखत व खरेदीखत करुन द्यावयाचे होत़े असे असतानाही संशयित टाळाटाळ करु लागल्य़ा. त्याचप्रमाणे संबंधित तीन सदनिका अन्य व्यक्तींना विक्री करुन फसवणूक केली, अशी तक्रार शेखर म्हाप यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल केल़ी. त्यानुसार पोलिसांनी अश्विनी ओझा हीच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 316(2) नुसार गुन्हा दाखल केल़ा.