खेड : शहरातील गांधीचौक येथील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या कल्याणी स्टोअर्स व सिद्धी मेडिकल स्टोअर्सचे कुलूप व सीसीटीव्ही कॅमेरे फोडत अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याचे समजते.
पूरस्थिती ओसरल्यानंतर पूरग्रस्त व्यापारी दुकानांच्या दुरुस्तीसह स्वच्छतेत गुंतलेले आहेत. अजूनही बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर आलेले नाहीत. अशा परिस्थितीत चोरट्यांकडून दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाल्याने व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीपासून पहाटे 6 वाजेपर्यंत पोलिसांची गस्त सुरू असते. तरी देखील चोरट्यांनी दुकाने फोडण्याचा प्रयत्न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही दिवसांपासून शहरात सीसीटीव्ही यंत्रणा देखील कार्यान्वित झाली आहे. तरी देखील चोरट्यांनी दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
खेडमध्ये दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न
