रत्नागिरी : तालुक्यातील खंडाळा बाजारपेठ येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने वाहन उभे करुन ठेवणाऱ्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल़ा. जयगड पोलिसांकडून मंगळवारी ही कारवाई करण्यात आल़ी. विश्वास शंकर बारगुडे (23, ऱा वाटद, खंडाळा रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वास बारगुडे यांनी 16 जुलै 2024 रोजी वाहन (एमएच 08 एएन 5937) हे खंडाळा बाजारपेठ एसटी पिकअप शेड येथे उभे करुन ठेवले होते. या वाहनामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने पोलिसांनी कारवाई केल़ी. या प्रकरणी बारगुडे यांच्यावर भारतीय न्याय संहिता 285 नुसार गुन्हा दाखल केला, असे पोलिसांकडून सांगण्यात आल़े