राजापुर:-रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच मा. कृषी राज्यमंत्री, विद्यमान आमदार श्री. सदाभाऊ खोत यांच्या विचारांशी प्रेरित होऊन सर्वसामान्य लोक, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, निराधार लोकांना अडीअडचणीमध्ये संतोष आरावकर हे मदत करत असतात. तसेच कोरोनाच्या काळामध्ये आमदार सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून आणि त्यांचे स्विय्य सहाय्यक श्री. आदिनाथ कपाळे यांच्या सहकार्याने कित्येक रुग्णांना सहकार्य केले होते. तसेच त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व अन्य अनेक आरोग्यविषयक योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.
संतोष आरावकर यांच्या प्रामाणिक कामाची दखल घेऊन रयत क्रांती संघटनेच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच त्यांना वैद्यकीय विभाग आघाडीचे प्रमुख म्हणून देखील नेमणूक करण्यात आली आहे. या माध्यमातून रयत क्रांती संघटना आपलं काम जिल्हाभर मोठ्या प्रमाणात वाढवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.