रत्नागिरी:-राज्यात खरीप 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना केंद्र शासनाच्या नियमानुसार राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एकूण 8 हजार 112 शेतकऱ्यानी 15 जुलैपर्यंत सहभाग घेतला आहे. 2024 मध्ये केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर थेट ऑनलाइन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा 16 जून 2024 पासून सुरू केली होती.
सहभागासाठी असलेली अंतिम 15 जुलैची मुदत वाढवून आता 31 जुलै करण्यात आली आहे. 15 जुलै सकाळी 10 पर्यंत या योजनेअंतर्गत 1 कोटी 36 लाख विमा अर्जद्वारे साधारण 90 लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते.
राज्यात सरासरी खरीप हंगाम पेरणी क्षेत्र 142 लाख हे आहे. गतवर्षी म्हणजेच खरीप 2023 मध्ये पीक विमा अर्ज संख्या 1 कोटी 70 लाख होती व विमा संरक्षित क्षेत्र 1 कोटी 13 लाख हेक्टर होते.