चिपळूण:-शहरातील राधाकृष्ण नगर परिसरात राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. हा तरुण काही दिवसांपूर्वीच येथील तामिळनाडू बँकेत रुजू झाला होता. या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सेल्वागणेश गुनासेकरण (23,राधाकृष्ण नगर, मुळ- विरुध्दनगर-तमिळनाडू) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. सेल्वोगणेश हा काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूहून चिपळूण येथे आला होता. त्याची येथील तामिळनाडू बँकेच्या शाखेत नेमणूक करण्यात आली होती. त्याने शहरातील राधाकृष्णनगर येथील चौरंग बंगला भाड्याने घेतला होता. शुक्रवारी तो कामावर न आल्याने त्याच्या बँकेतील कर्मचाऱ्याने त्याच्याशी संपर्क साधला असता त्याचा फोन बंद होता. अखेर संबंधित कर्मचाऱ्यानी राधाकृष्ण नगर चौरंग बंगल्यावर जाऊन चौकशी केली असता बंगल्याचा दरवाजा आतून बंद होता. यावेळी खिडकीतून पाहिले असता सेल्वागणेश गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्रकार उघडकीस आला. त्याने ही आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप पुढे आलेले नाही.