खेड:-तालुक्यात 2 दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे साखरोली येथे अचानक भूस्खलन झाल्याने खळबळ उडाली. या भूस्खलनातून अस्लम शहा यांचे कुटुंब बालंबाल बचावल्याचे समोर आले आहे.
साखरोली-मोहल्ला येथे अस्लम शहा कुटुंबासहीत वास्तव्यास आहेत. घराजवळ असलेल्या डोंगराचा भाग अचानक पुढे सरकला. ही बाब शहा कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या उरात धडकी भरली. अचानक झालेल्या भूस्खलनाने त्यांच्या घराचे काही अंशी नुकसान झाले असले तरी मोठी जीवितहानी टळली आहे.