आक्रमक ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा घेतला निर्णय
खेड:-तालुक्यातील शिरवली नं.1 शाळाया वर्गखोल्यांचे छत कोसळल्याची घटना ताजी असताना पुरे प्राथमिक शाळेच्या इमारतीचा जोत्याचा भाग शनिवारी सायंकाळच्या सुमारास कोसळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा सुटल्यानंतर घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा मोठी दुर्घटना टळली आहे. दुर्घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. या बाबत तातडीने शिक्षण विभागाकडून तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे समजते.