संगमेश्वर : गेले दोन दिवस कोकणात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने दैना उडवली आहे. जिल्ह्यात अनेक नद्यांना पूरस्थिती दिसून येत आहे. संगमेश्वर बाजारपेठेतही पुराचे पाणी भरल्याने व्यापारी चिंतेत आहेत. पहिल्या पुराचा चिखल निघतो न निघतो तोच आठ दिवसात पुन्हा पुराचे पाणी भरल्याने व्यापारी हैराण झाले आहेत. कसबा येथील काझी मोहल्ला येथेही पुराचे पाणी भरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. माखजन परिसरातही पूर स्थिती निर्माण झाली आहे.