गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांनी 29 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेली निविदा नियमबाह्य असल्याचे केलेल्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे. यामुळे गटविकास अधिकाऱ्यानी, सदर प्रकरणी दोषारोप पत्र का दाखल करू नये, याचा खुलासा ग्रामसेवकांकडून मागवण्यात आला आहे.
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर ग्रामपंचायतीच्या बोगस निविदा प्रसिद्धी प्रकरणी वेळणेश्वर येथील सुरेंद्र घाग यांनी गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली होती. कोणतेही अंदाजपत्रक व तांत्रिक मान्यता न घेता एकदा निविदा पसिद्ध केल्याचे केलेल्या चौकशीमधून पुढे आले आहे. याबाबत विस्तार अधिकाऱ्यानी केलेल्या चौकशी अहवालामध्ये नियमबाह्य निविदा असल्याचे म्हटले आहे. यामुळे आता गटविकास अधिकाऱ्याना याप्रकरणी कारवाई करावी लागणार आहे.
ग्रामसेवकाला दिली नोटीस
या बाबत प्रथम दोषारोप पत्र दाखल करण्याअगोदर वेळणेश्वरच्या ग्रामसेवक यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला असून तशी नोटीस दिल्याचे गटविकास अधिकारी प्रमोद केळसकर यांनी सांगितले.