चिपळूण : दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक बसून त्यामध्ये 13 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना चिपळूण-कराड मार्गावर पेढांबे-भराडे येथे घडली. त्यामध्ये दोन एसटी चालकांचा समावेश आहे. या सर्वांवर शिरगाव आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. या अपघातात दोन्ही एसटी बसेसो नुकसान झाले.
स्वारगेट-गुहागर ही बस चिपळूणकडे येत होती, तर खेड-कोल्हापूर चिपळूणहून पुढे नियोजित पवासाला जात होती. असे असताना या दोन्ही बस तालुक्यातील पेंढोब-भराडे येथे आल्या असताना त्याची समोरासमोर धडक बसली. त्यात एसटी चालक पुरुषोत्तम पंडित मुंडे व सचिन शशिकांत दुबल हे जखमी झाले. याशिवाय बसमधील राजेंद्र सावंत (47), संगीता सावंत (38), सृष्टी सावंत (8), ईशा ओक (18), मेघा सावंत (66), शंकुतला सुतार (37), नेहा जोशी, कृष्णांत सुतार, अभय पाटणकर (46), भारती जाधव (50), निकिता जाधव (25), गणेश देवकांत (39) हे पवासी किरकोळ स्वरुपाचे जखमी झाले. या सर्व जखमांना शिरगाव प्राथमिक आरोग्य केंदात, तर अन्य दोघांनी कामथे रुग्णालयात उपचार घेतले. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले.