चिपळूण:-शहरातील डीबीजे महाविद्यालयाच्या आवारात असलेली भिंत विद्यार्थ्याच्या अंगावर कोसळून भिंतीखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सिद्धांत प्रदीप घाणेकर, ( 19, मूळ गाव देहगाव दापोली, सध्या लोटे) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थाचे नाव आहे
सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी कॉलेज सुटल्यानंतर एक विद्यार्थी घरी परतला नाही. त्याचा शोध घेण्यात येत होता. मात्र तो कुठेच सापडला नाही. अखेर डीबीजे महाविद्यालयाच्या आवारात भिंत कोसळल्याचे लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन आज पाहण्यात आले. त्या ठिकाणी भिंतीखाली त्याचा मृतदेह दिसून आला. या घटनेने ग्रामस्थांच्या पायाखालची जमीनच सरकली. या दुर्घटनेमुळे कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे.