खेड:-तालुक्यातील भोस्ते जगबुडी नदीपात्रात एका युवकाचा शुक्रवारी दुपारच्या सुमारास मृतदेह तरंगताना आढळला. ही बाब पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. विसर्जन कट्टाचे सदस्य व सहकाऱ्यानी मृतदेह बाहेर काढला. तुषार मनोहर त्रिपाठी (21) असे मृत युवकाचे नाव आहे.
हा युवक शहरातील एका बेकरीत कामाला होता. गुरूवारपासून तो बेपत्ता होता. अखेर त्या मृतदेह जगबुडी नदीपात्रात आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दुपारच्या सुमारास मृतदेह तरंगत असल्याची बाब काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आली. त्यानुसार पोलीस स्थानकात खबर दिल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर व सहकारी घटनास्थळी पोहोचले. विसर्जन कट्टाचा सदस्य गणेश खेडेकर व सहकाऱ्यानी पाण्याच्या प्रवाहातून मृतदेह बाहेर काढला. याबाबत येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.