रत्नागिरी:-सावकारी परवान्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यापकरणी अटक करण्यात आलेल्या सहकार निबंधक कार्यालयातील लिपिकाला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. विनायक रामचंद्र भोवड (57, रा.कसोप सडा, रत्नागिरी) असे या लिपिकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध लाच स्वीकारल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विनायक भोवड यांनी सावकारी परवाना मिळवून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच स्विकारल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 11 जुलै रोजी सकाळी तक्रारदार यांच्याकडून भोवड याला पैसे स्विकारताना अटक करण्यात आली. शुक्रवारी त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.