खेड:-किल्ले रायगडावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पुन्हा महादरवाजा जवळील पायरी मार्गावर दरड कोसळली. मात्र पायरी मार्ग 31 जुलैपर्यंत प्रशासनाने बंद ठेवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
किल्ले रायगडावर मोठ्या प्रमाणावर झालेल्या पर्जन्यवृष्टीसह ढगफुटीमुळे पाण्याचा प्रवाह पायरी मार्गावर आल्याने पायरी मार्ग खचण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. या ठिकाणी दरडी कोसळण्याचाही दाट संभव आहे. किल्ले रायगडावर जाणारा पायरी मार्ग बंद असला तरी दोन दिवस बंद ठेवण्यात आलेला रोपवे गुरुवारपासून सुरू करण्यात आला आहे. मात्र रायगड किल्ल्यावर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण दिवसभरात वाढल्याने किल्ल्यावर महादरवाजाजवळील भागात दरड कोसळली.