चिपळूण:-लॅपटॉप खरेदीसाठी ऑनलाईन पध्दतीने 3 लाख 11 हजार रुपये देण्यात आल्यानंतर यातूनच एकाची फसवणूक केल्याची घटना 14 ते 23 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमन कुमार (पूर्ण नाव माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद विठ्ठल गजानन काणेकर (24, कापसाळ) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमन कुमार याने विठ्ठल काणेकर याला ऑनलाईन लॅपटॉप पाठवून देतो असे सांगून त्याच्याकडून 3 लाख 11 हजार रुपये ऑनलाईन स्वरुपात घेतले. त्यानंतर अद्यापपर्यंत काणेकर याला लॅपटॉप न देता अमन याने काणेकर याच्याशी संपर्क न ठेवता 3 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार काणेकर याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.