राजापुर:-राजापूरचे आमदार राजन साळवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने लांजा तालुका कॅरम असोसिएशनने आयोजित केलेल्या आमदार चषक स्पर्धेचे बक्षीस वितरण थाटात झाले.
या वर्षातील ही पहिली जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा लांजा येथील कुणबी सेवा संघाच्या सभागृहात पार पडली. स्पर्धेच्या उद्घाटनाला अथर्व साळवी, माजी सभापती दीपाली साळवी, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, लांजा तालुका कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष राहुल शिंदे, स्पर्धा प्रमुख अमित देसाई, जिल्हा असोसिएशनचे सेक्रेटरी मिलिंद साप्ते, प्रसाद माने, कॅरम राष्ट्रीय पंच साईप्रकाश कानिटकर व राज्यस्तरीय पंच मंदार दळवी उपस्थित होते.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी जिल्हा असोसिएशनचे खजिनदार नितीन लिमये, सदस्य राहुल बर्वे, स्पर्धाप्रमुख अमित देसाई, मिलिंद साप्ते, राष्ट्रीय पंच साईप्रकाश कानिटकर, राज्यस्तरीय पंच मंदार दळवी आणि बहुसंख्येने खेळाडू तसेच प्रेक्षक उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल असा – पुरुष एकेरी अंतिम फेरी – अभिषेक चव्हाण विजेता विरुद्ध रियाज अकबरअली २५-००, २५-१३. उपान्य् फेरी १ – रियाज अकबरअली विजेता विरुद्ध राहुल भस्मे २५-००,२५-१६. उपान्त्य फेरी २ – अभिषेक चव्हाण विजेता विरुद्ध योगेश कोंडविलकर २५-१४, २५-००.
पुरुष दुहेरी अंतिम फेरी – रियाज अकबरअली / अभिषेक चव्हाण विजेता विरुद्ध सागर सावंत / मुक्तानंद वरवडेकर २५-१७, २५-००. उपांन्त्य फेरी १ – रियाज अकबरअली / अभिषेक चव्हाण विजेता विरुद्ध विजय कोंडविलकर २५-०५,२५-०१. उपान्त्य फेरी २ – सागर सावंत / मुक्तानंद वरवडेकर विजेता विरुद्ध राहुल भस्मे १६-२४, २५-१६ ,२५-१६.
महिला गट अंतिम फेरी – आकांक्षा कदम विजेता विरुद्ध निधी सप्रे २५-००,२५-००.
कुमार गट अंतिम फेरी – ओम पारकर विजेता विरुद्ध द्रोण हजारे २५-००, २५-००.
किशोर गट अंतिम फेरी – आर्यन राऊत विजेता विरुद्ध सोहम बुटाला २०-०६, २५-०१.
कुमार गट अंतिम फेरी – स्मित कदम विजेता विरुद्ध आयुष चव्हाण २५-०४, २३-००.