संगमेश्वर:-तालुक्यातील देवरुख नजीकच्या साडवली सह्याद्री नगर मित्र मंडळाचे सदस्य राष्ट्रीय कबड्डीपट्ट प्रशांत सुर्वे यांची आगामी प्रो कबड्डीच्या हंगामासाठी बंगाल वारिअर्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.प्रशांत सुर्वे हे सह्याद्रीनगर येथील मूळचे रहिवासी आहेत. कबड्डी खेळात त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात नावलौकिक मिळवून राज्यस्तरीय व त्यानंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाची चमक दाखवली. राष्ट्रीय कबड्डीपटू म्हणून त्यांची ओळख आहे. कोकणात चांगले कबड्डीपटू घडावेत यासाठी प्रशांत सदैव कार्यरत असतात. जिल्ह्यात भरवल्या जाणाऱ्या जिल्हा, राज्य कबड्डी स्पर्धेला नेहमी हजेरी लावून खेळाडूंना प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्याचे काम करत आहेत. या निवडीबद्दल त्यांचे संगमेश्वर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.