चिपळूण: चिपळूण तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर दिनांक ९जुलै रोजी पेढे परशुराम सवतसडा येथे दुचाकी व कंटेनरचा अपघात झाला. या आपघातात दुचाकीस्वार जखमी झाला आहे त्याला लाईफकेअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आली आहे.
पावसाळा सुरू झाला असून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. मुंबई -गोवा महामार्गावर पेढे परशुराम येथे दुचाकीस्वार व कंटेनरचा अपघात झाला असून दुचाकीस्वार समाधान सावंत (२८, रा. सावर्डे) हा जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान ॲम्बुलन्सचे चालक सत्यम पवार तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमीला लाईफ केअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.