दापोली:-तालुक्यातील खेम धरणात बुडालेल्या 19 वर्षीय कल्पेश बटावळे या मुलाचा मृतदेह शोधण्यात NDRF च्या टीमला यश आले आहे. मंगळवारी दुपारी त्याचा मृतदेह हाती लागला. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी रूग्णालयात पाठविण्यात आला.
हर्णैमधील खेम धरणात चार मुले पोहायला गेली होती. यामध्ये कल्पेश बटावळे हा 19 वर्षाचा मुलगा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह सापडत नव्हता. सोमवारपासून शोधकार्य सुरु होतं अखेर तो मंगळवारी दुपारी सापडला.
दापोली येथे जात असताना घरी न येता हे चारजण हर्णै येथील खेम येथील धरणावर गेले होते. आंघोळ करण्यासाठी धरणात उतरले असता यामध्ये कल्पेश बटावळे हा 19 वर्षाचा मुलगा पाण्यात बुडाला.
यानंतर तात्काळ पोलिस यंत्रणा उपस्थित राहून शोधकार्य करण्यात आले, मात्र अंधार असल्यामुळे आणि मुसळधार पाऊस , पाणी खोल असल्यामुळे शोधकार्य सकाळी करण्यात येणार असल्याची माहिती दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिली होती. अखेर आज मंगळवारी कल्पेश बटावळे याचा मृतदेह सापडला. सकाळी आलेल्या NDRF च्या टीमने मृतदेह शोधला आहे.