नवी दिल्ली:-‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ (PMJAY) आणि ‘ आयुष्मान भारत योजने’बाबत सरकार मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारआयुष्मान भारत योजनेअंतर्गत मिळणाऱ्या विम्याची रक्कम दुप्पट करणार आहे.
प्रस्तावाला अंतिम रुप देण्याची तयारी
एनडीए सरकार लाभार्थ्यांची संख्या आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची विमा रक्कम योजनेतील लाभार्थ्यांची कव्हरेज लिमिट प्रति वर्ष 5 लाख रुपयांवरुन 10 लाख रुपये करण्याची सरकारची तयारी आहे. तसेच, योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षांत लाभार्थी संख्या दुप्पट करण्याचाही निर्णय घेतला जाणार आहे. सरकारने येत्या तीन वर्षांत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या दुप्पट करण्याची घोषणा केली, तर देशातील दोन तृतीयांश लोकसंख्येला आरोग्य कवच मिळू शकेल.