तरवळ/अमित जाधव:-रत्नागिरी तालुक्यातील जि. प. आदर्श शाळा रानपाट येथील विद्यार्थी कु. विराज हेमंत कुवार याने फेब्रुवारी २०२४ मध्ये झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावून उज्वल यश संपादन केले आहे.
सदर परीक्षेसाठी ऐकून ६ विद्यार्थी बसले होते त्यातले ४विद्यार्थी पात्र आहेत व कुमार विराज कुवार हा तालुक्यात 21वा आला आहे त्याच्या या यशामुळे रानपाट शाळेचे, गावाचे तसेच पालकांचे नावलौकिक निश्चितपणे वाढले आहे. त्याला मार्गदर्शक शिक्षक श्री. मनोज जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यासाठी त्यांना मुख्याध्यापक श्री. भितळे सर आणि सहकारी शिक्षक श्री. अजय माने सर यांचे सहकार्य लाभले. श्री. जाधव हे शिष्यवृत्ती मार्गदर्शनासाठी झटून काम करणारे शिक्षक म्हणून नावाजले जातात. यापूर्वी २०१८ मध्ये त्यांनी एक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणला होता. तेथून पुढे प्रत्येक वर्षी काठावर जाऊन गुणवत्ता यादीसाठी मुले अपयशी ठरत होती. यावर्षी नेहमी प्रमाणे १००% विद्यार्थी परीक्षेला बसवून ६६.६७% निकाल लावण्यात यश मिळवले.
विराज जिल्ह्याच्या यादीत १६२पैकी १३३ व्या आणि तालुक्यात २१ व्या स्थानावर आला आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुहास भितळे सर आणि सहकारी शिक्षक श्री. अजय माने, श्री. प्रदीप पवार यांनी शाळेमार्फत शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी विराज कुवार आणि मार्गदर्शक शिक्षक श्री. मनोज जाधव यांचा सत्कार केला. मुख्याध्यापकांसह गट शिक्षणाधिकारी मा. प्रेरणा शिंदे मॅडम, खालगाव बीट शिक्षण विस्तार अधिकारी मा. सशाली मोहिते मॅडम आणि प्रभारी केंद्र प्रमुख मा. राणे सर यांनी विराज आणि श्री. जाधव सर यांचे अभिनंदन केले.
शाळा व्यवस्थापन समिती रानपाट, गावातील ग्रामस्थ, पालक तसेच केंद्र व परिसरातील शिक्षक यांचेकडून विराज वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.