चिपळूण: कापशी नदीत बुडून एका 15 वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील डेरवण खुर्द येथे 6 रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत सावर्डे पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रावणी सुधीर मोहिते (15, डेरवण) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डेरवण-बौध्दवाडी येथील कापशी नदीच्या पाण्यात गवतावरुन पाय घसरुन श्रावणी नदीत पडली. पाण्याच्या पवाहाबरोबर ती वाहत गेली. या घटनेनंतर तिची शोधाशोध करण्यात आली असता अखेर या नदीपात्रात तीचा मृतदेह आढळून आला.