चिपळूण: शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या पवेशव्दारावर एस.टी.बस आणि रिक्षा यांच्यात अपघात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. यात रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
एस.टी. बस नियोजित मार्गावर जाण्यासाठी बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशव्दारातून बाहेर पडत असताना रिक्षाला धडक बसून हा अपघात घडला. यात कोणालाही दुखापत झाली नाही. या अपघातानंतर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनास्थळी पोलीस दाखल होताच ही कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु होता. अपघातानंतर रिक्षा चालक व एस.टी.बस चालक पोलीस स्थानकात गेले होते. तिथे तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.