पालगड:-दापोली तालुक्यातील पालगड येथील कोंडी नदीच्या पात्रात युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. युवराज यशवंत कोळुगडे (36) असे मृत युवकाचे नाव आहे.
युवराज आई व मोठ्या भावासह पालगड- संभाजी नगर येथे रहात होता.युवराज हा आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करीत असे. 6 तारखेला सकाळी तो घरामधून बाहेर पडला तो परत घरी आला नाही. यामुळे त्यी सर्वत्र शोधाशोध सुरू होती. अखेर शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह कोंडीनदी पात्रात तरंगत आसलेला आढळून आला.
याबाबत पालगडचे पोलीस पाटील रुपेश बेलोसे यांना दूरध्वनीवरून कळविण्यात आल्यावर त्यांनी घटनास्थळी येऊन संबंधित माहिती दापोली पोलीस स्थानकाला कळवली. दापोली पोलीस स्थानको प्रसाद मोरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी अंकुश बामणे, संदीप इंदुलकर व सुनील मोरे यांनी मदत केली. या नंतर मृतदेह दापोली उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आला.