खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातून चिपळूणच्या दिशेने ट्रकमधून खैरतस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलादपूर वनविभागाच्या पथकाने सापळा रचला. तपासणी नाक्यावर ट्रकच्या फेऱ्यांचा झडतीत 430 खैरांची सोलीव तुकडे व ट्रक असा 7 लाख रूपयां ऐवज जप्त केला आहे. ट्रकमधून खैरी तस्करी करणाऱ्या सिद्दीकी अब्दुल रहिम वाढेल (रा. गोध्रा-गुजरात) याच्यासह अन्य व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. रोहा उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत, सहाय्यक वनसंरक्षक विश्वजीत जाधव, महाड परिक्षेत्र वनाधिकारी राकेश साहू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर वनपाल बाजीराव पवार, तपासणी नाका वनरक्षक नवनाथ मेटकरी, वनसंरक्षक संदीप परदेशी, मेने, निलेश नायकवाडे, पियांका जाधव, अमोल रोकडे आदांया पथकाने सापळा रात खैरी तस्करी रोखत पर्दाफाश केला.
सिद्दीक वाढेल हा आपल्या ताब्यातील जीजे 17/युयु 9837 क्रमांकाचा ट्रकमधून पोलादपूरहून चिपळूणच्या दिशेने 68 हजार 572 रूपये किंमतो 430 विनापरवाना खैराच्या सोललेल्या तुकड्यांची वाहतूक करत होता. गोपनीय माहितिच्या आधारे ट्रकची झडती घेतल्यानंतर त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. हे खैरचे लाकूड नेमके त्यांनी कुठून आणले, या पोलादपूर वनविभागाच्या पथकाकडून कसून शोध सुरू आहे.